About Us / आमच्याबद्दल
|| जय जोती जय क्रांती जय सावता ||
श्री. प्रविण जगन्नाथ बोचरे
संस्थापक (Founder)
📍 खामगाव, जिल्हा - बुलढाणा, महाराष्ट्र
📞 +91 9604295891
✉️ malivivahbandhan11@gmail.com
संस्थापकांचे मनोगत
नमस्कार,
मागील २० वर्षांपासून समाजकार्याचा वसा जपताना, समाजातील पालकांची घालमेल मी जवळून अनुभवली आहे. मुला-मुलींचे शिक्षण आणि करिअरच्या धावपळीत, त्यांच्यासाठी अनुरूप जोडीदार शोधणे हे पालकांसाठी चिंतेचे कारण बनले आहे.
महाराष्ट्रभर आपल्या समाजाचे अनेक मेळावे होतात, पण वेळेअभावी किंवा अंतरामुळे प्रत्येकाला तिथे उपस्थित राहणे शक्य होत नाही. हीच अडचण ओळखून, आम्ही समाजासाठी एक डिजिटल व्यासपीठ उभे करत आहोत.
आमचा उद्देश केवळ वेबसाइट पुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील पहिला 'ऑनलाईन माळी समाज मेळावा' घडवण्याचा आहे. जिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वधू-वर परिचय तर होईलच, पण आपले नातेवाईक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून YouTube द्वारे घरबसल्या हा सोहळा पाहू शकतील.
ही केवळ एक वेबसाइट नसून, आपल्या समाजाला जोडणारा एक आपुलकीचा धागा आहे. या कार्यात तुमचे आशीर्वाद आणि खंबीर पाठिंबा हवा आहे. चला, तंत्रज्ञानाच्या साथीने नात्यांची वीण अधिक घट्ट करूया.
आपला नम्र,
प्रविण बोचरे
महत्वाची सूचना: नोंदणी शुल्क आणि नियम
- सुरुवातीच्या १०० सभासदांसाठी: नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.
- १०० सभासदांनंतर: ऍडव्हान्स फीचर्स (मासिक ई-बुक आणि मेळावा प्रवेश) साठी ₹१०० (शंभर रुपये) नाममात्र शुल्क आकारले जाईल.
- उद्देश: हे शुल्क केवळ वेबसाईटच्या तांत्रिक खर्चासाठी आणि सर्वर मेंटेनन्ससाठी आकारले जात आहे.
- नफा कमावणे हा आमचा उद्देश नसून, समाजाला उत्तम सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे.
Our Vision (English Translation)
Namaskar, While serving the community for the past 20 years, I have deeply felt the anxiety of parents. In the hustle of education and career, finding a suitable life partner for their children has become a major concern for every family. Although meetups are held across Maharashtra, distance and time often make it difficult for everyone to attend. Recognizing this struggle, we have built this Digital Platform for our community. Our vision goes beyond just a website; we aim to organize Maharashtra's first Online Mali Community Meetup. Through modern technology, not only will brides and grooms be introduced, but relatives across the world can witness this via YouTube from the comfort of their homes. This is not just a website, but a bond of affection connecting our society. We need your blessings and support in this endeavor. Let us strengthen the bonds of relationships with the help of technology. Sincerely, Pravin Bochare